सातारा – उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व पक्षातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. परंतु उदयनराजेंच्या या शाही वाढदिवसाच्या कार्यक्रमावर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या ५ आमदारांनी बहिष्कार टाकला असल्याचं दिसून आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे, महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शंभुराज देसाई यांनी उपस्थिती लावली आहे.
दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, साताराचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे,कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण या आमदारांनी उदयनराजेंच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती लावली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंचं कौतुक केलं असून उदयनराजे म्हणजे मुक्त वि्दयापीठ आहेत. नियमदेखील तेच ठरवतात आणि दुस-याला शासन देखील तेच करतात असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS