उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश, पक्षाकडे ठेवल्या ‘या’ अटी!

उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश, पक्षाकडे ठेवल्या ‘या’ अटी!

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. भाजप श्रेष्ठींनी सर्व अटी अटी मान्य केल्यानंतर त्यांनी आज भाजपप्रवेश केला.खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. तसंच पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी, या अटी भाजपनं मान्य केल्याची माहिती आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

दरम्यान भाजपप्रवेशापूर्वी उदयनराजेंनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला.देशाची अखंडता टिकवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करत आहेत. शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपचं काम सुरू आहे. लोकसेवा करण्यासाठी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS