रामराजेंनी कुपोषित मुलासारखं वागू नये, वेळ पडली तर जशास तसं उत्तर देऊ – उदयनराजे

रामराजेंनी कुपोषित मुलासारखं वागू नये, वेळ पडली तर जशास तसं उत्तर देऊ – उदयनराजे

मुंबई – रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद आती चांगलाच पेटला आहे. नीरेच्या पाण्यावरून या दोघांमध्ये वाद सनरु झाला असून रामराजे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रामराजे वयाने मोठे आहेत म्हणून मी शांत आहे माझ्या वयाचे असते तर जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी केली. परंतु या शरद पवारांनी बोलवलेल्या बैठकीतून उदयनराजे भोसले बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी रामराजेंवर चोरदार टीका केली.

दरम्यान पिसाळलेली कुत्री जोपर्यंत असतील तोपर्यंत मी पिसाळलेलाच राहणार अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली होती. याबाबत उदयनराजे भोसले यांनी उत्तर देत रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. माझी तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी रामराजेंनी केली.

त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला हे बोलणं शोभतं का? मी पिसाळतो असं ते म्हणतात. होय ते लोकांची कामं झाली नाहीत तर मला राग येतोच. मी कधीही कोणाचं वाईट चितलेलं नाही. तरीही ते म्हणतात मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतोच. रामराजेंनी एक लक्षात ठेवावं मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं कुणीही करू नये. कुपोषित मुलासारखं वागू नये वेळ पडली तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत. असं उदयनराजो यांनी म्हटलं आहे.

COMMENTS