उदयनराजे भोसलेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपच्या हालचाली, ‘या’ नेत्याची उमेदवारी धोक्यात !

उदयनराजे भोसलेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपच्या हालचाली, ‘या’ नेत्याची उमेदवारी धोक्यात !

नवी दिल्ली – सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे.राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

दरम्यान यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जागी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजेंची उमेदवारी धोक्यात आली आहे.

दरम्यान रामदास आठवले यांचं राज्यसभा सदस्यत्व मार्च महिन्यात संपत आहे. मात्र भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळणं कठीण मानलं जात आहे. खासदारकी गमवावी लागल्यास आठवलेंना केंद्रीय मंत्रिपदावरही पाणी सोडावं लागणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS