मराठी कामगार सेनेच्या उपोषणाला खासदार उदयनराजे भोसलेंचा पाठिंबा !

मराठी कामगार सेनेच्या उपोषणाला खासदार उदयनराजे भोसलेंचा पाठिंबा !

सातारा – आरटीओमधील भ्रष्ट अधिकारी आणि रस्त्यांवरील वाढत्या रहदारीविरोधात मराठी कामगार सेनेनं उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामधील तमाम वाहतूकदार आज ओव्हरलोडमुळे त्रस्त आहेत. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहनचालकांचं वाहनांवर नियंत्रण राहत नाही. परिणामी राज्यात दिवसाला कुठे ना कुठे या ओव्हरलोड वाहतुकीचा बळी जात आहे. तसेच दिवसागणिक हा बळींचा आकडा वाढत असल्यामुळे रस्ते खराब होत असून त्यामुळे वाहतूकही मंदावत आहे. ही जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक दलाल आणि आरटीओमधील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरू असल्याचा आरोप मराठी कामगार सेनेनं केला आहे. तसेच हजारो कोटींचा शासनाचा महसूल हे भ्रष्ट आरटीओ अधिकारी दिवसाला बुडवत असून प्रत्येक ओव्हरलोड गाडी मागे या आरटीओमधील अधिकाऱ्यांचा हफ्ता बांधला गेला असल्याचंही कामगार सेनेनं म्हटलं आहे. याविरोधात मराठी कामगार सेनेने तीव्र आंदोलन छेडलं करण्याचा इशारा दिला असून त्यांच्या या आंदोलनाला आणि उपोषणाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान यापूर्वीही मराठी कामगार सेनेनं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर काही दिवस ही रहदारी थांबले होती परंतु काही दिवस गेल्यानंतर भ्रष्टाचाराला चटावलेली ही आरटीओमधील अधिकाऱ्यांची जमात पुन्हा जागी झाली आहे. काही ठिकाणी तशी चिन्ह ही दिसू लागली असून  म्हणूनच ही ओव्हरलोड वाहतूक कायमस्वरूपी थांबावी यासाठी ४ जून पासून आझाद मैदान इथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय मराठी कामगार सेनेनं घेतला आहे. तसेच ही ओव्हरलोड वाहतूक बंद झाली नाही तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा इशारा मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला आहे.

COMMENTS