पुणे – सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले हे आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही पक्षाकडून लढले तरी आमचा पक्ष त्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटील केली आहे. मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत आज पुण्यामध्ये मराठा समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उदयनराजे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान मराठा समाजाचा नवीन पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा यावेळी पक्षाचे संयोजक सुरेश पाटील यांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार की नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. परंतु ते कोणत्याही पक्षातून निवडणूक लढले तरी त्यांना आमचा पक्ष पाठिंबा देणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे.
COMMENTS