मुंबई – दिवभर देशभरातील माध्यमांमध्ये चर्चा सुरू असलेली अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक मातोश्रीवर पार पडली. ही बैठक नियोजित वेळेप्रमाणे एक तास होणार होती. मात्र तब्बल दोन तास ही बैठक चालली. बैठक जास्त वेळ चालली त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असे अर्थ काढले जात आहेत. मात्र दोन्ही पक्षांकडून अजूनही याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
ही बैठक तीन टप्प्यात ही बैठक पार पडली. अमित शहा हे मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांसह पोहचले. त्यांचं स्वागत करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आले. अमित शहा यांना घेऊन हे दोन्ही नेते मातोश्रीवर आत गेले. चहापान झाल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी बंददारआड चर्चा केली. त्यानंतर शहा, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे अशी चौघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि आदित्य बाहेर आले. त्यानंतर तब्बल तासभर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा बंददारआड चर्चा झाली.
COMMENTS