“23 वर्षांच्या पोराची सीडी काय दाखवता ? तुमच्या 22 वर्षांच्या विकासाची सीडी दाखवा !”

“23 वर्षांच्या पोराची सीडी काय दाखवता ? तुमच्या 22 वर्षांच्या विकासाची सीडी दाखवा !”

सांगली – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. गुजरातमध्ये 23 वर्षांच्या हार्दिक पटेलने तुमच्या नाकात दम भरला आहे. 23 वर्षांच्या पोराला तुम्ही घाबरला आहात. त्यामुळेच देशात सर्वशक्तीमान  समजले जाणारे गुजरात विधानसभेसाठी तब्बल 50 सभा घेत आहेत. या शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीका केली. एवढ्या सभा तुम्हाला एका विधानसभेसाठी घ्याव्या लागतात मग हा तुमचा नैतिक पराभव नाही का ?  असा सवालही उद्धव यांनी केला आहे.

गुजरातमधील हार्दिक पटेलच्या सीडी प्रकरणावरुनही त्यांनी  भाजपवर जोरदार टीका केली. गुजरातमध्ये अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू आहे. 23 वर्षांच्या तरुणाची सीडी काय दाखवता ? तुमच्या 22 वर्षांच्या कारभाराची सीडी दाखवा असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.

नोटबंदीमुळे दहशतवाद थांबला नाही तर तो वाढला असंही उद्धव ठाकरे म्हणाले. रोज सीमेवर जवान शहीद होत आहेत. जवान बलीदान करुन देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. आणि तुम्ही त्याचंही क्रेडीट घेण्याचा प्रयत्न करत आहात. दहशतवाद कमी झालाच तर तो जवानांच्या कर्तुत्वामुळे झाला असं म्हणायला हवं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS