पंढरपूर – पंढरपुरातील महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पहारेकरीच चोऱ्या करायला लागल्यावर कसं होणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल कराराच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे. मी जे बोलतो तेच करून दाखवतो, भाजपसारख्या थापा मारत नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची योजना सरकारकडे नाही हे लोकसभेत मंत्र्यांनीच सांगितलं असल्याची टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान लोकांनी राष्ट्रीय पक्षांची मस्ती उतरवली असून तुम्हीही महाराष्ट्रात दाखवून द्या असं आवाहनही यावेळी ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.तसेच अयोध्येत राम मंदिर बांधणारच, कुंभकर्णाला जागं करणारच. कुंभकर्णा वेळेवर जागा हो नाही तर पेटलेला हिंदू तुला जागा करेल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. देवांच्या नावावर खोटे बोलू नका, असं केलं तर ठोकून काढू हे भाजपने लक्षात ठेवावं. आता महाराष्ट्रात भगव्याच राज्य आहे असा इशाराही यावेळी ठाकरे यांनी दिला आहे.
विठ्ठलाच्या साक्षीने धनगर आणि इतर समाजाच्या बांधवांना वचन देतो की, कोळी महादेव कोळी असतील त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावणार असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना आपलं वचन कधीही मोडत नाही, हे ध्यानात ठेवा असही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS