मुंबई – दोन दिपसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. यादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती असून या बौठकीत 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याबाबत शिवसेनेची भूमिका ठाम असल्याचं कालच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनीही स्वबळाचे संकेत दिले आहेत. परंतु बैठकीमध्ये मात्र लोकसभा निवणुकीत युती करण्याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वेगळी खेळी खेळली जात आहे का असा सवाल आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
COMMENTS