मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजपच्या युतीची घडी अजून सुटली नाही. त्यामुळे युती होणार की नाही याबाबत साशंकता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका आणि दौरे सुरु आहेत. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असल्यामुळे युतीसाठी भाजपकडून आग्रह केला जात आहे. परंतु याबाबत शिवसेनेनं मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली होती, या बैठकीतही युतीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर उद्या पुन्हा उद्धव ठाकरे यांनी शिवेसना खासदारांची बैठक बोलावली आहे.
उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी ११ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे खासदारांसोबत लोकसभा निवडणुकीवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते भाजपसोबत युती करणार की नाही याबाबतही आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS