मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे.उद्या दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात ही बैठक पार पडणार आहे. उद्याच्या या बैठकीत भाजपसाेबत सत्तेत जाण्यासंदर्भात तसेच विधिमंडळ नेता निवडीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
तसेच आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली आहे. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, शिवाजीराव आढळराव पाटील, विजय औटी या बैठकीला उपस्थितीत होते. काल भाजपसाेबतची बैठक रद्द केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे. या बैठकीमुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.
दरम्यान कोकणात अतिमुसळधार पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या वेळीच पावसाच्या तडाख्याने बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेले भातशेतीचे पिक वाया गेले आहे. याच ओल्या दुष्काळग्रस्त भागाचा आदित्य ठाकरे उद्या दौरा करणार होते. परंतु उद्याच्या बैठकीमुळे त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
COMMENTS