उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक ?

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक ?

अहमदनगर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक केली असल्याची माहिती मिळाली होती. पण ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाली असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची गाडी पुढे गेल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील मागे असलेल्या गाडीवर दगडफेक झाली आहे. यात कोणीही जखमी झाले नसल्याची बातमी लोकमतनं दिली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौ-यावर असून आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निलेश लंके यांच्या गटाने दगडफेक केल्याचा आरोप आहे. निलेश लंके विजय औटी यांचे प्रखर विरोधक समजले जातात.निलेश लंके हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी तालुक्यात सेना मोठ्याप्रमाणात वाढवलेली आहे. पण सध्या आमदार विजय औटी आणि लंके यांचे बिनसले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. परंतु दुस-या बाजूला ही बातमी खोटी असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

 

COMMENTS