मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन !

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. याबाबतचं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांचं ट्वीट

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल. मी माझ्या हृदयाजवळच्या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. हा विषय म्हणजे अयोध्येतील राम मंदिर उभारण्याचा आहे. 9 नोव्हेंबरला मी जेव्हा करतारपूर कॉरिडोरसाठी पंजाबमध्ये होतो, तेव्हा मी राम मंदिराबाबतचा ऐतिहासिक निर्णय ऐकला असं मोदी लोकसभेत म्हणाले.

COMMENTS