फडवणीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला मोठा धक्का,  ठाकरे सरकारनं घेतला आणखी एक निर्णय!

फडवणीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला मोठा धक्का, ठाकरे सरकारनं घेतला आणखी एक निर्णय!

नागपूर – महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर फडणीस यांच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आज आणखी एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राज्यातील जिल्हा नियोजन समितीवरील तसंच कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. याबाबत राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या वतीने शासन आदेश काढले आहेत.

ग्रामीण भागात पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीवर तसंच कार्यकारी समितीवर विशेष निमंत्रित सदस्य तसंच नामनिर्देशित विशेष सदस्य या नियुक्त्या करून ताकद दिली जाते. फडवणीस सरकार यांच्या कार्यकाळात बहुतेक जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांना अशा नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या. त्यात काही प्रमाणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील केल्या होत्या. परंतु आता वित्त आणि नियोजन मंत्रालयाने आदेश काढून तत्कालीन नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

COMMENTS