मुंबई – राम मंदिर निर्माण न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरण जी महाराज यांनी आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबईतील शिवसेना भवन येथे जन्मेजयशरण महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचं निमंत्रण स्वीकारलं असून दस-यानंतर अयोध्येला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान रामजन्मभूमी मंदिर निर्माणाबाबत चर्चा करण्यात आली असून सर्वसहमतीने निश्चित कार्यक्रम ठरवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया जन्मेजयशरण महाराज यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेच्या ताकदी आणि मदतीशिवाय राममंदिर निर्माण होऊ शकत नसून शिवसेना हा अयोध्या गड असल्याची प्रतिक्रिया जन्मेजयशरण महाराज यांनी दिली आहे.
COMMENTS