तुम्हाला जमत नसेल तर राम मंदिर शिवसेना बांधेल – उद्धव ठाकरे

तुम्हाला जमत नसेल तर राम मंदिर शिवसेना बांधेल – उद्धव ठाकरे

मुंबई – रावण दरवर्षी उभा राहतो, पण राम मंदिर केव्हा होणार तुमच्याकडून जर राम मंदिर बांधायला सुरुवात झाली नाही तर आम्ही ते बांधू. आम्ही टीका सहन करतोय ती केवळ हिंदुत्वासाठी तुमचे चोचले पुरवण्यासाठी नाही. आपल्याकडे सत्ता असतानाही काही करु शकत नाही याची खंत असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच राम मंदिर बांधायला छाती किती आहे ते नाही मनगटात बळ किती आहे ते महत्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी अनेक मुद्द्यांवरुनही ठाकरे यांनी सरकावर जोरदार फटकेबाजी केली आहे. तसेच अनेक जण आले. त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पण ते संपले. शिवसेना उभी आहे. आमचं तर आवाहन आहे या मैदानात असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.तसेच आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत त्यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. किती वेळा घोषणा करायच्या. एकदा घोषणा केली आणि ती शिवसैनिकांना समजली असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.देशाचा कारभार कसा चाललाय? आता संघही सरकारविरूद्ध बोलायला लागला आहे. आज जो कोणी सत्तेत आणि विरोधात आहे त्याला जाणीव करून द्यायला मी इथे आहे की हिंदू अजून मेलेला नाही असही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आणि इथं विचारले तेच प्रश्न तिथं मोदींना विचारणार. आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. त्यांच्या आशेवर पाणी जरी पडलं तरी तुमचं आसन कधी जळून खाक होईल सांगता येत नाही. माझ्या देशाचा पंतप्रधान एकादाही अयोध्येत का गेला नाही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.यावेळी पंतप्रधान मोदींनाही त्यांनी टोला लगावला असून विष्णूचा अकरावा अवतार असताना तुम्हाला महागाई का रोखता येत नाही. महागाई रोखण तुमच्या हातामध्ये नाही मग तुमच्या हातामध्ये नक्की आहे तरी काय? नितीन गडकरी म्हणाले होते की आमचं सरकार येऊच शकत नाही. त्यामुळे त्यांनी टोलमाफीसारखी आश्वासने दिली. नितीन गडकरींनी लक्षात घ्याव मराठी माणसांनी खोटं बोलू नये. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलं नाही. अशी टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS