मुंबई – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात एण्ट्री मारली. यावेळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला शिवसेनेचे सर्व बडे नेते उपस्थित होते. याशिवाय उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेतलेले मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि नितीन राऊत हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाचे सर्व मंजले खचाखच भरले होते. उद्धव ठाकरे यांना हार-तुरे देऊन स्वागत करण्यात आलं.या स्वागतानंतर उद्धव ठाकरे अँटीचेंबरमध्ये गेले. त्याठिकाणी मंत्र्यांसोबत थोडावेळ चर्चा करुन ते कॅबिनेट बैठक घेणार आहेत. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS