त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना दिलं स्नेहभोजनाचं निमंत्रण?

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना दिलं स्नेहभोजनाचं निमंत्रण?

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज सायंकाळी 7:30 वाजता स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे. त्यात महाविकासआघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाहून भाजप आमदारांना आमंत्रणासाठी फोन करण्यात आल्यानंतर भाजप आमदार येणार की त्यावरही बहिष्कार घालणार याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजप आमदार स्नेहभोजनला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं घमासान युद्ध सुरु आहे. सावरकरांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे. शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये आणखी तणाव वाढला आहे. हाच तणाव दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे भाजप नेते स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS