मुंबई – मॅग्नेटिक महाराष्ट्रचा मुख्य कार्यक्रम आणि नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात डावलल्याने उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्रवरही बहिष्कार टाकला असून मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आज होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाकडे उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आयोजित महाउद्योग रत्न सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे, तर उद्धव ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते.
दरम्यान नाराज असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला अनुपस्थित लावली आहे. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आता दरी वाढत असल्याचं दिसत आहे. रविवारी झालेल्या नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही शिवसेनं बहिष्कार टाकून पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे शिवसेनेनं केलेल्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे आता दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपनं शिवसेनेला विधानसभा एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिली असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु उद्धव ठाकरे यांच्या जाहीर नाराजीवरुन आगामी काळात शिवसेना-भाजप एकत्र दिसतील का नाही याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
COMMENTS