मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी विधानसभेसाठीचा जो फॉर्म्युला ठरला होता. त्या फॉर्म्युल्यानसारच युती होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेले काही दिवस युती हा विषय गाजताेय. लाेकसभा निवडणुकीच्या आधी आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. वेगळी पद्धत यावेळी अवलंबली आहे.
मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी हे उपहासात्मक नाही. दाेन दिवसांत समजेल सर्व काही. कुठलीही खळखळ नाही.असं बदलायला लागलं तरं सरकारवरचा विश्वास उडेल असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच विकास कामांबद्दल शिवसोनेचा विराेध नाही, आरेत कारशेडला सकारण विराेध आहे. नाणारबाबतही तसंच आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेंवर नाव न घेता टीका केली होती. तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना 370 प्रमाणेच आता सरकारनं राम मंदिराचा निर्णयही घ्यावा असं म्हटलं होतं. त्यावर गेल्या दोन तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टावर आपला विश्वास ठेवायला हवा, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. मी बयानबाजी नाही, हिंदुंच्या वतीने बाेलताेय. न्यायदेवतेवर विश्वास आहे. हा खटला खूप सुरू वर्षे आहे. पुन्हा अयाेध्येत जाणार आहे. पंतप्रधानांना विश्वास असेल की काेर्ट लवकर निर्णय देणार आहे. पंतप्रधानांना वाटत असेल तर थांबावं लागेल. बहुमताचे सरकार नव्हते, पण शिवसेनेनं दगा दिलेला नाही. राजीनामे कुठं गेले, असा विचारलं जातं हाेतं. तेवढं साेडलं तर शिवसेना साेबत आहे. असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS