मुंबई – शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक आज शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली आगामी भूमिका मांडली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेच्या मनातली भावना असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं दिसत आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काल जी आमदारांसमोर भूमिका मांडली होती, तीच भूमिका आजही त्यांनी मांडली आहे. जे ठरलं आहे, ते द्या, त्यापेक्षा जास्त नको अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर सर्व जिल्हाप्रमुख आणि खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला हात वर करुन समर्थन दिलं आहे.
तसेच आज भाजप नेते नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाचा 50-50 फॉर्म्युला ठरला नसल्याचं म्हटलं आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही जनतेची भावना असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले असल्याचं दिसत आहे.
COMMENTS