आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं करणाऱ्यांना सोडणार नाही – उद्धव ठाकरे

आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं करणाऱ्यांना सोडणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवल्यामुळे मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परीषद घेतली. महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही दररोज 6 ते 7 लाख मजुरांना नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचं लॉकडाऊन आज संपलं. आता 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. कोरोनाविरोधातील लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहेत. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

करोनाची लागण झाली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. सहा महिन्याच्या बाळाने करोनाला हरवलं आहे. त्या मुलाच्या आईशी मी बोललो आहे. सहा महिन्याचं बाळ करोनाला हरवू शकतं हेदेखील लक्षात घ्या. त्यानंतर ८३ वर्षांच्या आज्जींशी बोललो त्यांनीही करोनावर मात केली आहे. ही लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. हे काय करणार तर ट्रिटमेंटची गाईडलाईन ठरवणार आहेत. यामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगलं काम या टीमने सुरु केलं आहे. मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या. कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशी आपण रुग्णालयांची विभागणी करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS