मुंबई – भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अजूनही भेटीची वेळ कळवण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे एकनाथ खडसेंची भेट घेणार की नाही याबाबत संभ्रम होता. परंतु एकनाथ खडसे यांची भेट उद्धव ठाकरे हे लवकरच घेणार असल्याचं दिसत आहे. कारण नाथाभाऊ आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना भेटणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये स्पष्टता दिसत नाही. आम्ही बाजूने मतदान केलं. ते का केलं? सरकारच्या बाजूने केलं म्हणजे देशभक्ती नाही. घुसखोरांना बाहेर काढावे ही आमची भूमिका. जोपर्यंत त्यामध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेनेने काय करावे हे कुणी सांगू नये. 370 कलम काढले त्याचे सर्वप्रथम अभिनंदन आम्ही केले, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
COMMENTS