पुढचं सरकार आपलंच आणि पुढचा… काय ते  तुम्हाला कळलंच असेल?- उद्धव ठाकरे

पुढचं सरकार आपलंच आणि पुढचा… काय ते तुम्हाला कळलंच असेल?- उद्धव ठाकरे

मुंबई – मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसचा लोकार्पण सोहळा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. पुढचं सरकार आपलं असणार असं म्हणत थोडं थांबून पुढचा…आणि पुन्हा थोडं थांबून थेट उपस्थितांनाचा प्रश्न विचारला. पुढचा तुम्हाला काय ते कळलं असेल? असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्यामुळे भाजपनंतर शिवसेनेनंही मुख्यमंत्री पदावर दावा केला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. जागावाटपाबाबत आज दोन्ही पक्षामधील नेत्यांची पहिली बैठक पार पडली आहे. या फेरीत 160+110+18 हा फॉर्म्युल्याबाबत खलबतं सुरू असल्याचं दिसत आहे. परंतु हा फॉर्म्युला
शिवसेनेला अमान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यानुसार महायुतीतील इतर घटकपक्षांना 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असल्याची माहिती आहे. परंतु उरलेल्या 270 जागांपैकी भाजप 160 तर शिवसेनेला 110 जागा देण्याच्या फॉर्म्युल्यावर खलबतं सुरु आहेत. परंतु शिवसेनेला मात्र हा फॉर्म्युला मान्य नसल्याची माहिती आहे. या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे उपस्थित होते.

COMMENTS