मुंबई – शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना संबोधीत केले. तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. खूप काही अफवा सुरु आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मीडियाच्या माध्यमातूम काही प्रस्ताव सुरु आहेत. आपण मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. भाजप अध्यक्ष अमित शाहांबरोबर माझं जे ठरलंय ते करावं एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही स्थिर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीदिवशी अनौपचारिक गप्पांमध्ये ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिस्कटलीय. पण मला खात्री आहे सगळं सुरळीत होईल. जे ठरलं त्याच्या सुईच्या टोकापेक्षा अधिक नको, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नवनियुक्त आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला अन्य आमदारांनी हात वर करुन अनुमोदन दिलं. त्याचबरोबर शिवसेना विधानसभा मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
COMMENTS