मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना शेतकय्रांच्या मदतीसाठी जाण्याचे आदेश दिले आहेत. युती आघाडी देशभर होत असते. युती केल्यानंतर आम्हाला विजयी का केले तर त्यांचा आमच्यावर विश्वास आहे.संपूर्ण महाराष्ट्रात आपण उठून उभे राहिलो तर या विमा कंपन्या कुठं जातील ? सरकार करतंय म्हणून काम करण्याचे थांबू नका. लोकसभा निवडणुकीनंतर लोक काय बोलतायत ते आता ऐका ? एकवेळ लोकसभेत उपस्थित नाही राहिला तरी चालेल, पण ज्यांच्यामुळं लोकसभेत गेलाय त्यांच्याकडं जा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान निवडणुका येतात व जातात, वन नेशन, वन इलेक्शन येईल तेव्हा येईल. मुख्यमंत्री कुणाचा होईल तो होईल पण सध्या सर्व आमदारांसह सर्व सेना पदाधिका-यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी मैदानात उतरा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच शेतक-यांना नडणा-यांना शिवसेनेची ताकद दाखवून द्या असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS