याला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर!

याला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर!

मुंबई – पीक विम्या कंपन्यांविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संयुक्त महाराष्ट्रावेळी मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील आहोत. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेने मुंबईत हा धडक मोर्चा काढला आहे. जी व्यक्ती माणूस म्हणून जगतेय त्यांचा हा मुद्दा आहे, याला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत उसं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील सर्व विमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांच्या नावांची यादी या कंपन्यांनी आणि बँकांनी पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे.

सरकार वारंवार सांगतंय की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. बँकाही सांगताहेत की कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफी दिलीय तर त्याचे पैसे गेले कुठे? हे जनतेला कळायला हवे. कारण पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुबाडल्याच्या बँकांकडून कर्जमाफी न मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. त्यामुळे ते पैसे गेले कुठे? याचं उत्तर आम्हाला हवं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS