‘हा’ आपल्या सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी – उद्धव ठाकरे

‘हा’ आपल्या सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी – उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकय्रांचे आभार मानले आहेत. शेतकरी कर्जमाफी हा आपल्या सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय असून तसंच शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि संयमाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि संयम सोडला नाही. त्यामुळेच ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण होत आहे. तसंच डिसेंबरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. पहिली यादी आणि दुसरी यादी यापूर्वी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सर्व ठिकाणी व्यवस्थित काम सुरू आहे. लवकरच ही योजना पूर्ण केली जाईल, असंही उद्धव ठाकरे हणाले आहेत.

दरम्यान एनपीआर आणि एनआरसी संबंधी तीन पक्षांसह मित्रपक्षांच्या सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. एनपीआरमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे ही समिती तपासून पाहणार आहे. कोणत्याही नागरिकाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही.तसेच येत्या ७ मार्चला आपण अयोध्येला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. देवाचं दर्शन करण्यात काय राजकारण आहे. देव हा देव असतो यात कोणतंही राजकारण नाही. मी अयोध्येला जाणारचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारसमोर मुस्लिम आरक्षणाचा
मुद्दा आला नाही. त्याबाबत कोणतीही आदळआपट करण्याची गरज नाही. मुद्दा सरकारसमोर आल्यावर कागदपत्र तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. शिवसेनेनं अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS