मुंबई – कर्नाटकमध्ये सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्याची संधी राज्यपालांनी द्यायला हवी, मात्र कर्नाटकात जे झालं, तो लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच जनसंघापासूनचा कार्यकर्ता असलेल्या कर्नाटकच्या राज्यपालांवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय असं होणार असेल तर निवडणुका घेण्याऐवजी थेट दिल्लीतून मुख्यमंत्री जाहीर करावा, म्हणजे मोदींना परदेश दौरे थांबवावे लागणार नाहीत अशी जोरदार टीकाही उद्धव टाकरे यांनी केली आहे.
दरम्यान कर्नाटक म्हणजे ‘कर नाटक’ आहे, अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उल्हासनगरमधील सभेदरम्यान ते बोलत होते. तसेच उल्हासनगरच्या विकास आराखड्याला आपला विरोध असून, हा विकास आराखडा फाडून चुलीत टाकण्याचे आदेश त्यांनी यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच राममंदिराची घोषणा ही भाजपची एव्हरग्रीन घोषणा असून निवडणुका आल्यावरच हिंदुत्त्व आठवतं, नंतर मेहबुबा मुफ्ती वगैरे कुणीही चालतं अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
COMMENTS