शिवसेना कायमच मराठा बांधवांच्या पाठिशी आहे आणि राहिल – उद्धव ठाकरे

शिवसेना कायमच मराठा बांधवांच्या पाठिशी आहे आणि राहिल – उद्धव ठाकरे

मुंबई – राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायद्याला धरून आहे असा निकाला मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी दिला.त्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांचे आभार मानले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मराठा बांधवांच्या पाठिशी कायमच होती आणि राहिल असं म्हटलं आहे. कोर्टात टिकेल असंच आरक्षण राज्य सरकारने देऊ केलं होतं. जो शब्द आम्ही पाळला आहे. मराठा आरक्षणासाठी दिल्लीत लढा द्यावा लागला तरीही शिवसेना तुमच्या पाठिशी उभी राहिल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच मराठा, मराठेतर अशा वादात न पडता शिवरायांचे मावळे म्हणून आपण एकत्र राहिलो तर जगात वेगळी ताकद निर्माण होऊ शकेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच मराठा आरक्षणाविरोधात उगाच लढायचं म्हणून लढू नका, वादात रमू नका असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विरोधी गटाला केलं आहे. आहेत तसंच आम्ही कोणत्याही गोष्टीचं श्रेय लाटण्यासाठी पाठिंबा दिला नव्हता असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS