जाे कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला टोला!

जाे कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला टोला!

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला नाव न घेता टोला लगावला आहे. जाे कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, आपल्याशी जसे वागलं तेच त्यांच्या पदरी आलंय, आपण कुणाचं वाईट चिंतले नाही. हा महाराष्ट्र सुडाने कधी वागला नाही. जाे सुडाने वागताे त्याला साेडत नाही. आम्ही कधी वागणार नाही. कालसारखा क्षण शिवसेनेतही आला हाेता. बाळासाहेबांना अटक करण्यावेळी असाच क्षण आला हाेता, पण तेव्हा आेढूनताणून असं केलं नव्हतं. बाळासाहेबही काेर्टात स्वत: हजर झाले हाेते. तेव्हा कुणी सांगितले नव्हते की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मी राजकारण साेडणार नाही, शेती करणार नाही, मी मुख्यमंत्री करून दाखवणार.तसेच युती केल्यावर पाठीमागून सुरी मारणार नाही. असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. तसेच काेल्हापूरच्या पुरात मला जाता आले नाही, पण शिवसैनिकांनी तिथं खूप काम केले. माझ्या मनात कुणाचं वाईट करायचं नाहीय, काल घडलेले आपण बघितलं.मला त्यांच्या कुटुंबात रस नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS