घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत द्या – उद्धव ठाकरे

घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत द्या – उद्धव ठाकरे

मुंबई  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे. राज्यातील जनतेला घरपोच दारू नको आहे तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच ऑनलाईन दारू हे आपल्या संस्कृतीत नसून राज्याची ‘शोभा’ करणारा प्रयोग रोजच सुरू आहे. दुष्काळग्रस्तं भागात तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. दुष्काळ ग्रस्तांना मदतीच्या रांगेत उभं करून मारू नका असंही उद्धव ठाकरे यांनी म्ह्टलं आहे.

दरम्यान ऑनलाईन दारू विक्रीसाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचं वक्तव्य उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर सरकारवर चौफेर टीका सुरू झाली होती. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं असून असा कोणताही सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरुनच उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली असून घरपोच दारू देण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS