पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चमत्कारामुळे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना-भाजप युती असताना आताच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कमी जागा देण्यात आल्या होत्या. आमचे कमी आमदार असूनही आम्ही करून दाखवलं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा बक्षिस समारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण गाजत असताना मुख्यमंत्र्यांनी ‘शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा’ असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी हा कर्जमुक्त होणारच असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. तसेच सहकार, राजकारण वेगळं करू शकत नाही. कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याबाबतचं संशोधन इथे केलं जातं, पवार साहेबांना कमी जागांत सरकार बनवलं, त्यामुळे कोणाला जास्त जागा असं म्हणून चालणार नाही.
ऊस शेती करताना लोकांच्या आयुष्याचं चिपाड होतं, याकडे राज्यकर्ते म्हणून दुर्लक्ष करता येणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच आधी आम्ही सत्तेत अर्धवट होतो. त्यामुळे निर्णय घेताना बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होता, त्याला फोडणी कोण देणार? असा टोलाही त्यांनी फडणवीस सरकारला लगावला.
COMMENTS