288 ची तयारी झालीय, आता 2014 राहिलेले नाही, उद्धव ठाकरेंचं युतीबाबत मोठं वक्तव्य!

288 ची तयारी झालीय, आता 2014 राहिलेले नाही, उद्धव ठाकरेंचं युतीबाबत मोठं वक्तव्य!

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. 288 मतदारसंघातील इच्छुकांना इथं बाेलवलंय. म्हणजे युती हाेणार नाही असं नाही. न्याय हक्कासाठी लढल्यावरच लाेक सत्ता देतात. अमित शहा यांच्यासाेबत चर्चा झाली आहे. काेण कुठं जिंकणार, यावरून दाेघांत जागा ठरतायत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहेत. ते आज मुंबईत घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान सगळ्यां इच्छुकांचा आदर करताे. प्रत्येकाशी एकेकट्याला भेटलाे. 288 ची तयारी झालीय, आता २०१४ राहिलेले नाही. सत्ता पाहिजे असेल तर खेचाखेची करून चालणार नाही. जागावाटप आज उद्या हाेईल. काही जागा अंतिम व्हायच्या आहेत. लाेकसभा निवडणुकीपूर्वी मी यू टर्न मारला. माझ्या शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे. मला बंडखाेरी चालणार नाही. जागावाटप झाल्यावर फालतुपणा चालणार नाही, गद्दारी करायची नाही.भाजपच्या जागांबाबतही हेच करायचं आहे. तसेच विधानसभेवर भगवा फडकवूया, दाेन दिवसांत युतीचे जाहीर हाेईल असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

COMMENTS