अयोध्यावरुन परतताना ठाकरे कुटुंबीय थोडक्यात बचावले!

अयोध्यावरुन परतताना ठाकरे कुटुंबीय थोडक्यात बचावले!

उत्तर प्रदेश – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवशीय अयोध्या दौय्रावर गेले होते. या दौय्रावरुन परतताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुंटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. फैजाबाद विमातळावर उद्धव ठाकरे यांच्या विमानाचा अपघात होता होता टळला आहे. फैजाबाद विमानतळावर विमानापुढे नील गाय आल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी विमान चालकान विमान वेळेवरच थांबवल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. सुदैवाने विमानाला काहीही झाले नसून उद्धव ठाकरे व कुटुंबीय थोडक्यात बचावले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे हे कालपासून अयोध्यायात्रेवर होते. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांची फौज घेऊन अयोध्येत गेले होते.  काल उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रसिद्ध शरयू नदीवर महाआरती झाली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. या दरम्यान विमानासमोर
नील गाय आल्याने मोठा अपघात होता होता टळला आहे.

COMMENTS