आगीत सिरमच्या नव्या प्रोड्क्सचे नुकसान

आगीत सिरमच्या नव्या प्रोड्क्सचे नुकसान

पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पुणे येथील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. दरम्यान, बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रोडक्ट्स येणार होते त्यांच्यावरही प्रभाव पडल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, दिलीप वळसे पाटील, खासदार गिरीश महाजन, सीरमचे सीईओ अदर पूनावाला उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाकरे म्हणाले, “संकटात आशेचा किरण लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली आमि सर्वांच्याच काळजाचा ठेका चुकला. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. आग लागली तेथील दोन मजले वापरात होते. वरील ठिकाणी जिथं केंद्र सुरु होणार होतं तिथे आग लागली. सर्वांना जी एक शंका आणि भीती वाटत होती. मात्र करोना लसीला कोणताही फटका बसलेला नाही,”. “आगीची सखोलपणे चौकशी केली जात आहे. अहवाल येत नाही तोवर निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

पत्रकार परिषदेत देखील उपस्थित होते. आगीत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रोडक्ट्स येणार होते त्यांच्यावरही प्रभाव पडल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS