मुंबई – शिवसेनेचा आणि ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रातील दिग्गजांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच 400 शेतकऱ्यांनाही
विशेष मान देण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष आणि चुलत भाऊ राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरुन निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरेही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू आहे. तब्बल 30 हजार खुर्च्या शिवाजी पार्कात लावल्या आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन आमदार शपथ घेणार आहेत. यामध्ये एक नाव आश्चर्यकारक असून, काँग्रेसने नाना पटोले यांना स्थान दिल्याची माहिती आहे.उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्याने त्या पदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अजित पवार यांना हे पद देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. परंतु, पक्षाविरुद्ध बंड केल्याने त्यांच्याविरुद्ध काहीसा नाराजीचा सूरही आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले मत जयंत पाटील यांच्या पारड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
COMMENTS