पालघर – पोटनिवडणुकीच्या तुझ्याकडे 15 दिवस मिळाले होते, पण आता 8 ते 9 महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगा यांना दिला आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला असला होता. परंतुही शिवसेनेनं पुन्हा एकदा श्रीनिवास वनगा यांना 2019 लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. असून यावेळी त्यांनी वनगा यांना आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आता ही जागा सोडायची नाही, असा आदेश दिला आहे.
दरम्यान पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात आली असून ‘साम दाम दंड भेद वाल्या निवडणुकीत श्रीनिवास यांनी ‘त्यांना’ घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन एवढी मतं मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. सहा लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झालं. खिलाडूवृत्तीनं हार स्वीकारावी लागते, पण मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, 2019 चा हिरो तूच आहेस, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या घोषणेमुळे उद्धव ठाकरेंनी लोकसभा स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केल्यामुळे आता पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये युती होणार नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS