शिवसेना एक वादळ आहे तर शिवसैनिक हे कवच आहेत, शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया!

शिवसेना एक वादळ आहे तर शिवसैनिक हे कवच आहेत, शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया!

मुंबई – आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्याय सहन करु नका आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला असल्याचंही शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.

दरम्यान मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. तसेच दुर्दैवी परिस्थिती आहे, तोंडावर मास्क लावायला लागला आहे. पण आपलं तोंड कोणी बंद करु शकत नाही. कोरोनाचं संकट आलं तेव्हा कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या, त्या आता आपण 100 लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखी वाढवणा र असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही. शिवसेना पक्षाची स्थापना झाली त्यावेळी एकही नगरसेवक नव्हता. त्यावेळी नारळ फोडला त्याच पाण्याचे थेंब माझ्या अंगावर उडाले त्यात मी ओला चिंब झालो आहे, हे शिवसैनिकामुळे. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

मुंबईही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे.
शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही.

मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला, आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS