मुंबई – अयोध्यावारीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता वाराणसी दौरा करणार आहेत. याबाबत लवकरच दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शरयू नदीच्या तीरावरील महाआरतीनंतर आता उद्धव ठाकरे करणार गंगा पूजन करणार आहेत. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असून राम मंदिर निर्माणाची गर्जना वाराणसीतही करण्यात येमार आहे.
दरम्यान अनेक धार्मिक आणि आध्यत्मिक संघटनांनी उद्धव ठाकरे यांना वाराणसी भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे पंढरपूर दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाराणसी दौऱ्याचा कार्यक्रम ठरणार आहे. 27 जुलै रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवसादिवशी उद्धव ठाकरेंनी वाराणसी गंगा पूजन आणि अयोध्यावारी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अयोध्यावारी यशस्वी नंतर शिवसेनेचे राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन होणार आहे.
COMMENTS