मुंबई – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार विनायक राऊत यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राऊत यांची गटनेता पदावर नियुक्ती केली असून याबाबत ठाकरे यांनी संसदीय मंत्रालयाला पत्र लिहून राऊत यांची गटनेतापदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं राज्यातून एकूण 18 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी विनायक राऊत यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा 1 लाख 78 हजार 322 मतांनी पराभव केला होता. तर 2014 मध्येही त्यांनी दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.
COMMENTS