उद्धव ठाकरेंनी पुरवला शेतकय्राच्या मुलीचा ‘तो’ हट्ट!

उद्धव ठाकरेंनी पुरवला शेतकय्राच्या मुलीचा ‘तो’ हट्ट!

सातारा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी काल सातारा-सांगली जिल्ह्यातील ओला दुष्काळ पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक गावांना-शेतकऱ्यांना भेट दिली. यादरम्यान एका शेतकय्राच्या मुलीनं धरलेला हट्ट उद्धव ठाकरे यांनी पुरवला आहे. उद्धव ठाकरेंनी काटेवाडी गावातील भानुदास कोरडे
या शेतकऱ्याच्या कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. भानुदास कोरडे यांच्या मुलीनं उद्धव ठाकरे यांनी तिच्या घरी दोन मिनिटे का होईना येण्याचा हट्ट धरला होता. अखेर उद्धव ठाकरे यांना तिचा हट्ट पुरवावा लागला आणि ते थेट तिच्या घरी पोहचले.यावेळी या कुटुंबाचं शिवसेनेविषयीचं प्रेम पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले होते.

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकय्रांना धीर दिला आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभी केली जातील. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये,खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे शेतकऱ्यांना दिला.

COMMENTS