नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे काही मंत्री सहभागी आहेत.यावेळी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राम भक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेच्यावतीने राम मंदिर निर्मितीसाठी 1 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राम मंदिर ट्रस्टंच बँक खाते कालच उघडलं आहे. त्यात शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी राम मंदिर बांधण्यासाठी दिला जाईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान मी तिसऱ्यांदा अयोध्येत येणं हे सौभाग्य आहे. मी येथे येणार, पुन्हा पुन्हा येईन असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच भाजपपासून दूर, हिंदुत्वापासून दूर गेलो नाही.भाजप आणि हिंदुत्व वेगळं आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मी भाजपला सोडलं आहे हिंदुत्व नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. तसंच महाराष्ट्रातील सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतंय, आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
COMMENTS