मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विभागवार खासदारांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सोमवारी ही बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने न लढलेल्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचा आढावा या बैठकीत उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युती होणार नसल्याचा अंदाज मांडला जात आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी केली जात आहे. परंतु शिवसेनेकडून हवा तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भाजपनं सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने न लढलेल्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
COMMENTS