मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर करण्यात आल्यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची चांगलीच धावपळ झाली, एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी पक्षातर्फे आणलेल्या पुष्पगुच्छाला कापडी वेष्टन होते.परंतु मुद्रक बाजीराव दांगट यांनी सत्कारासाठी आणलेल्या पुष्पगुच्छाला प्लास्टिक वेष्टन होते ही बाब रामदास कदम यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच प्लास्टिकचे वेस्टन हटवले.
दरम्यान झालं असं की कार्यक्रमादरम्यान मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचा सत्कार सुरु असताना रामदास कदम अचानक आसनावरून पुढे सरसावले आणि त्यांनी पुष्पगुच्छावर असलेलं प्लास्टिक वेष्टन तातडीनं हटविले. कदम यांच्या ‘प्रसंगावधाना’ने व्यासपीठावर उपस्थित असलेली पक्षाची नेते मंडळी, सभागृहात उपस्थित असलेले शिवसैनिक काही सेकंदासाठी आवाक झाले. व्यासपीठावर नेत्यांपुढे असलेल्या टीपॉय वरील अन्य पुष्पगुच्छ या प्रसंगानंतर लगेचच हटवण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान रामदास कदम यांची चांगलीच पळापळ झाली असल्याचं समोर आलं आहे.
COMMENTS