मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. परंतु यापूर्वीच ठाकरे यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्का दिला आहे. या दौ-यादरम्यान 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. परंतु त्यांच्या सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती आहे.
दरम्यान आपण या सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे परवानगी नाकारण्याचा संबंधच नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. अयोध्या काही पाकिस्तानात नाही, त्यामुळे सभेला परवानगी कशाला मागायची असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहे. आरती करायलाही परवानगी हवी आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शरयू नदीवर कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत त्यालाही परवानगीची गरज नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS