मुंबई – सत्तास्थापन करण्यास भाजपनं नकार दिल्यानंतर राज्यपालांनी आता शिवसेनेला सत्तास्थापन करण्यास निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे हे सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी शरद पवार यांच्याकडे करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवारांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
COMMENTS