उद्धव ठाकरेंची मराठी मुद्द्यावर शिवगर्जना

उद्धव ठाकरेंची मराठी मुद्द्यावर शिवगर्जना

मुंबई-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. येत्या 30 तारखेपर्यंत दुकानाच्या पाट्या मराठीत न केल्यास पाट्यांना काळे फासा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. शिवसेना भवन येथे विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही अशी घोषणा केेली आहे.

 

परंतु मुंबई महानगरपालिके वर शिवसेनेची सत्ता आहे. तरी मराठी पाट्यांचा नियम करून त्यावर अंमलबजावणी करायचं सोडून, इशारे, आंदोलने, आणि तोडफोडीची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईतील बहुसंख्यक दुकानाच्या पाट्या ह्या हिंदी किंवा इंग्रजीत असून त्या मराठीत करण्यात याव अशी मागणी यापूर्वीच मनसेने केली होती. आता शिवसेनाही मराठी मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसत आहे.

COMMENTS