मती, गती आणि प्रगती असं हे सरकार – ठाकरे

मती, गती आणि प्रगती असं हे सरकार – ठाकरे

मुंबई -“सरकार तीन पक्षाचं आहे. या सरकारमध्ये मती आणि गती आहे. मती, गती आणि प्रगती असं हे सरकार आहे. बारामती नव्हे, बारामती वेगळी. नवीन गोष्टी येत आहेत. सध्या राज्यातील परिस्थिती समाधानकारक आहे,” असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृह येथे २५ भारतीय कंपन्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष  यांच्या प्रमुख उपस्थितीत ६१ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, उद्योग प्रतिनिधी म्हणून जिंदाल ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, “पिझ्झा, आयस्क्रिम, तेल, गॅस, दूध, चीज सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या येथे आहेत. मॅगनेटिक महाराष्ट्र म्हणजे मॅगनेटिक पॉवर आहेच, पण ती पॉवर कसली आहे, कशामुळे मॅगनेटिक शब्द वापरला तर ती पॉवर तुम्ही आहात. घराघरात लक्ष्मी जाते तेव्हा घरातील लोक कसे आहेत ते बघते. घरातील सदस्य समाधानी आहेत का की आपापसात लढत आहेत हे पाहत असते. घरात समाधानी वातावरण असेल तरच लक्ष्मी येते. तुम्ही सगळे आमच्या घरातली लोकं आहात”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS